नाद…

Ok, so this is the first poem I’ve attempted in my mother tongue, Marathi 🙂

नाद…

रम्य राती चैतन्य तेज देणारा
निखळता तारा तो नाद.
आवेगाने घेतलेली बेभान झेप,
ते मोकळा श्वास म्हणजे नाद.

कोरड्या जमिनीला जसा पहिल्या पावसाचा गंध,
कोमेजलेल्या ओंडक्यावर नव्या पालवीचा जन्म,
मुक्त विचारांचा वाहणारा उनाड वारा,
उन्हात मिळणारा सावलीचा थंड निवारा.

गडबडीवर पसरलेलं जसं मोकळं आकाश,
वादळावर मात करुन झालेली ती पहाट,
डोळ्यात दिसणारं त्याचं खोडकर हास्य,
मनी हुरहुर लावणारं ते अर्धवट स्वप्न.

मनाच्या आडोशात गुप्त,
जोपासलेल्या आठवणींचा ठेवा.
रेंगाळणार्‍या जीवनात आनंदाचा स्पर्श.
ती निरागस, भाभडी जिद्द म्हणजे नाद…

Advertisements

5 thoughts on “नाद…

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s